Top collection of latest Marathi messages on Diwali Special messages in marathi.
Diwali Special trending messages

*फसवणुकीचा नवीन प्रकार*.
*इंटरनेट सोशल मिडिया वर xxx ची एका सुंदर मुली बरोबर ओळख झाली. चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे, मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.*
*असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले. ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही. तेव्हा भीतीचे कारण नाही.*
*त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे?"*
*ती म्हणाली, "काळजी करू नकोस. तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग. मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.*
*ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य... तिचा नवरा खरेच परत आला. तिने नवऱ्याला सांगितले की, तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय.*
*पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कोठे कोठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.*
*काम संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.*
*घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत. इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे.*
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
______________________________________
आता लवकरच दिवाळी येत आहे. ती आनंदाची जाणे अपेक्षित असल्यास खालील घडलेली घटना लक्षात घ्या
एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,
"अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"🤔🤔
.
.
.
.
थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!
.
.
.
.
.
.
.
पत्नी :-
"अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!!
मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची...!!
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!!
एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"🤔🤔🤔
"काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..???
अरे देवा...!!
कसं होईल या संसाराचं...???🤔🤔
काय म्हणावं या माणसाला....??
बाई बाई बाई ...!!!!
मी म्हणून संसार करत राहिले...!!
मुस्कटदाबी सहन करून..!!!
जळला मेला बायकांचा जन्म...!!
देवाला रोज सांगते - देवा पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!!
देवा पांडुरंगा...!!"🙏🙏
पती - "अग अग किती किंचाळतेस...??
तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!😢😢
तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???"
.
.
.
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!
.
.
.
तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"🤔🤔🤔
.
.
तात्पर्य 👉👉.... बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात...!!
आणि खापर ही नवरोबा वर छान फोडतात..!!👍👍
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...!!😂😃😆😜
*दिवाळी आलीय , काळजी वाटली म्हणुन आधीच सुचना पोस्ट केली*
Click here to send Valentine Day Messages for your love
