Top collection of latest Marathi messages on Interesting and short story in marathi.
Short stories and laghu katha

#कथा
तुझं ना माझं जमेना...
आजही दोघाचं भांडण झालं...
रागाच्या भरात त्याने तांब्या दिला भिरकावून...स्वयंपाकघरात पाणी पाणी झालं आणि तिच्या डोळ्यात पण...नवरा बायकोच्या भांडणाचा विषय विचारायचा नसतो... आणि विचारही करायचा नसतो...
पण पाणी पुसता पुसता तिला मात्र सगळंच आठवत होत...
तिच्या आणि त्याच्या घरच्यांचा विरोध, त्यावरून झालेले वाद, तरीही ठाम राहून केलेले लग्न.. दोघांचंच छोटंसं भाड्याने घेतलेले हे घर... घरमालकच्या बंगल्यातल्या दोन खोल्या... घरात यायला एक दरवाजा आणि मागे गार्डन मध्ये असणारा एक दरवाजा...
छान नाही पण बरं चाललं होतं दोघाचं... पण आज परत वाद... तिची ही विचारशृंखला तुटली ती धाडकन आपटणार्या दरवाजाने.. त्या मागोमाग दरवाजा बाहेरून बंद झाल्याचा आवाज... ती पटकन धावत बाहेरच्या खोलीत आली.. दरवाजा बाहेरून बंद होता... मटकन खाली बसली...
मला सोडून गेला हा .. घड्याळात बघितलं तर 12 वाजले होते... एवढ्या रात्री ह्याला कुठे शोधू... मागच्या दरवाजाने कुंपणाच्या बाहेर गेली... दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शुकशुकाट नुसता ... चिटपाखरूही नव्हतं ह्या वाक्याचा अर्थ तिला तेव्हा कळला... थोडी लांब चालत गेली बघायला.... पण अंधाराची तिला भीती होतीच लहानपणापासून ... त्यात रस्त्यावरचे दिवे बंद झाले... मधावत धावत धापा टाकत माघारी घरी आली... सोफ्यावर बसली...
नवऱ्याचा मोबाइलला समोर टेबल वर होता...उठून त्याचं पैश्याच पाकीट बघितलं तेही जागेवर होत... तिच्या जीवात-जीव आला..म्हणजे हा काही जास्त लांब गेला नाही आणि जाऊ शकणारही नाही... पण गेला कुठे हा.. हा विचार नाही जात नव्हता... म्हणतात ना.. मन जे चित्तीं ते दुष्मन ना चित्तीं... काय काय डोक्यात यायला लागलं..
तेवढ्यात दरवाजा ढकलून तो घरात आला... हातात कचऱ्याचा डब्बा होता... हिचा जो काही बांध कोसळला ... त्या प्रवाहाला काही बांधच नव्हता... त्याला कळेच ना... नेमकं काय झालं ते... तरीही तिला थोपटत तो म्हणाला"
अग कचरा टाकायला गेलो होतो... रागाच्या भरात खूप काही बोललं जातं उगाच मग वाईट वाटत... म्हटलं कचरा टाकून येवुया... त्यानिमित्ताने तरी डोकं शांत होईल.. मग बोलू... आपणच एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं ना.. नाहीतर काय फायदा एवढं सगळं सहन करून एकत्र असायचा" ह्या वाक्यवार तिने अजून मिठी घट्ट केली... कारण तिची निवड अचूक होती...
म्हणतात ते खोटं नाही नवरा बायकोच्या भांडणात पण प्रेम असतं... शेवटी काय तुझं ना माझं जमेना...
Click here to send Valentine Day Messages for your love
